15 May 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Waiting Ticket | वेटिंग तिकीट रेल्वे प्रवाशांनो, नवीन नियम लागू, ट्रेनमध्ये सीट विसरावी लागेल, अपडेट लक्षात घ्या ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK
x

RBI Digital Rupee | 1 डिसेंबरपासून सामान्य लोकांसाठी डिजिटल रुपी लॉन्च होणार, कसे काम करेल पहा

RBI Digital Rupee

RBI Digital Rupee | रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. सामान्य ग्राहकांसाठी ई-रुपयातील व्यवहारांची सुविधा दोन दिवसांनंतर सुरू करण्यात येईल, असे आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिटेल स्तरावर डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने 1 डिसेंबरपासून रिटेल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) साठी पायलट प्रोजेक्ट आणणार असल्याची माहिती दिली आहे.

आरबीआयने दिली माहिती
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी रिटेल डिजिटल रुपया (e₹-R) पहिला लॉट लाँच करेल. डिजिटल रूपया डिजिटल टोकन स्वरूपात असेल, जी कायदेशीर निविदा असेल. सध्या ज्या मूल्यामध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यात डिजिटल रुपया जारी केला जाईल. ही चाचणी १ डिसेंबर रोजी क्लोज्ड युझर्स ग्रुपमध्ये (सीयूजी) निवडक ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. यामध्ये ग्राहक आणि बँक व्यापारी या दोघांचाही समावेश असेल. सध्या त्यात 4 बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

कसा होईल व्यवहार?
आरबीआयने म्हटले आहे की व्यावसायिक आस्थापनांमध्ये क्यूआर कोड वापरुन व्यापाऱ्यांना पेमेंट दिली जाऊ शकतात. भागीदार बँकांनी देऊ केलेल्या आणि मोबाइल फोनवर साठवलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे युजर्स ई-आरद्वारे व्यवहार करू शकणार आहेत.

चाचणीत चार बँकांचा समावेश होता
या चाचणीत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेसह चार बँका सहभागी होणार असून, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे या टेस्ट होणार आहेत. डिजिटल रुपयाचे वितरण बँकांमार्फत करण्यात येणार असून पायलट ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या बँकांनी देऊ केलेल्या डिजिटल वॉलेटद्वारे युजर्संना ई-रुपयात व्यवहार करता येणार आहे. म्हणजेच या बँकांच्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: RBI Digital Rupee will launch on 1 December check details on 30 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RBI Digital Rupee(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या