 
						REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज ही कंपनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत आहेत. या स्टॉकमध्ये पुढील काही दिवसात आणखी तेजी पाहायला मिळू शकते. हा स्टॉक गुंतवणुकदारांना 20-22 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 265 टक्के परतावा कमावून दिला होता. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आरईसी लिमिटेड स्टॉक 8.96 टक्के वाढीसह 504.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
SBI सिक्युरिटीज फर्मने पुढील 3 महिन्यांसाठी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 455.4-464.6 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची टारगेट प्राइस सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20-22 टक्के अधिक आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 524 रुपये होती.
आरईसी लिमिटेड कंपनीच्या कर्ज पुस्तकाचा आकार 5 लाख कोटी रुपये आहे. वार्षिक आधारावर त्यात 17.1 टक्के दराने वाढ होत आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या कर्ज वितरणात देखील 66.7 टक्के दराने वाढ होत आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत कंपनीने 4.5 रुपये अंतरिम लाभांश वाटप केला होता. तर कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 2.75 टक्के आहे.
8 फेब्रुवारी 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 524 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 19 एप्रिल रोजी या कंपनीच्या शेअर्सने 415 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.3 टक्के वाढली आहे.
मागील सहा महिन्यांत आरईसी लिमिटेड स्टॉक 72 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 375 टक्के मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		