27 April 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट
x

REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी

REC Share Price

REC Share Price | आरईसी लिमिटेड म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या सरकारी मालकीच्या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1.6 लाख कोटी रुपये कर्ज उभारणीची योजना आखली आहे. बुधवारी या कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1.2 लाख कोटी कर्ज उभारणीची योजना जाहीर केली होती. ज्यात मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये वाढ करून 1.5 लाख कोटी करण्यात आली होती. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 451.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आरईसी लिमिटेड कंपनी 1.6 लाख कोटी रुपये कर्ज उभारणी करणार आहे. यापैकी 1.45 लाख कोटी रुपये कर्ज देशांतर्गत बाँड्स किंवा डिबेंचरद्वारे उभारले जाणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने बँका, वित्तीय संस्था, NBFC कडून देखील अल्पकालीन कर्ज म्हणून 5,000 कोटी रुपये कर्ज उभारणीची तयारी केली आहे.

आरईसी लिमिटेड कंपनी कमर्शियल पेपर जारी करून 10,000 कोटी रुपये कर्ज उभारणार आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीला आरईसी लिमिटेड कंपनीला देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

27 मार्च 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 447.8 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 292.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची वार्षिक उच्चांक किंमत पातळी 524 रुपये होती. 2023 मध्ये आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स निफ्टी PSU निर्देशांकामधील 250 टक्के परतावा देऊन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेअर्समधे सामील झाले होते.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी आरईसी लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना तिसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 19 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023- 24 साठी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 4.5 रुपये तिसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीने प्रति शेअर 6.5 रुपये असे दोन लाभांश वाटप केले होते.

कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 28 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला होता. 17 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणुकदारांच्या खात्यात लाभांश जमा केला जाईल. आरईसी लिमिटेड ही सरकारी कंपनी नवरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आरईसी लिमिटेड कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 52.63 टक्के होता. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 47.37 टक्के होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| REC Share Price today on 29 March 2024

हॅशटॅग्स

REC share price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x