
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. औद्योगिक वायू उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 613.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2013 मध्ये या कंपनीचे 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 613 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 5 वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,815.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्याच्या किमतीच्या तुलनेत 2800 टक्के वाढले आहे.
रेफेक्स इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः रेफ्रिजरंट गॅसशी संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी गॅस रिफिलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग संबधित व्यवसाय करते. तसेच रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनी अशा हायड्रोफ्लोरोकार्बन रेफ्रिजरंट वायूंच्या श्रेणीमध्ये व्यवहार करते जे मुख्यतः एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स आणि रेफ्रिजरेटिंग उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.