
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही दिवाळखोर कंपनी विक्रीच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांना अपेक्षा आहे की, हिंदुजा समूह डिसेंबर 2023 पूर्वी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करेल.
दरम्यान, रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून मजबूत तेजीत वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 11.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.93 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका आठवड्यात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12.39 रुपये होती. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 96 टक्के तोटा दिला आहे.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांनी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे कर्ज निराकरण करण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अर्ज केला होता. त्यानंतर कंपनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली. हिंदुजा ग्रुप व्यतिरिक्त, टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने देखील रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावात बोली लावली होती. परंतु लिलावाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे.
हिंदुजा समुहाचा भाग असलेल्या IndusInd International Holdings Limited कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावात सर्वात मोठी बोली लावली होती. आता हिंदुजा समूह या कंपनीचा ताबा घेण्यासाठी भांडवल उभारणी करत आहे. यासाठी हिंदुजा समुहाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीत असलेले आपले शेअर्स तारण ठेवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे केली होती.
मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली. आता हिंदुजा समूह अंतर्गत आर्थिक स्रोत आणि खाजगी पत कंपन्यांकडून भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुजा समूह आपल्या इतर काही कंपन्यांचे शेअर्स तारण ठेवून भांडवल जमा करू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.