
Reliance Capital Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती ‘अनिल अंबानी’ आता कंगाल झाले आहेत. ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर्समध्ये उतरती कळा लागली आहे. सलग पाच दिवसात हा स्टॉक खाली लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात हा स्टॉक 10 टक्के कमजोर झाला आहे. रिलायन्स कॅपिटल ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे.
दिवाळखोरीचे संपूर्ण प्रकरण :
NCLAT म्हणजेच अपीलीय न्यायाधिकरणाने NCLT चा आदेश बाजूला सारून ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सला म्हणजेच कर्जदात्यांच्या समितीला उच्च बोली लावण्याचा अधिकार आहे, असा आदेश दिला. अपीलीय न्यायाधिकरणाने CoC ला लिलाव यंत्रणा सुरू ठेवण्याची आणि दोन आठवड्यांनंतर बोली आमंत्रित करण्याचा सूचना दिल्या. NCLAT ने Vistara ITCL India Ltd ने दाखल केलेल्या याचिकेत हा आदेश जाहीर केला होता. अनिल अंबानीच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीला ‘विस्तारा आयटीसीएल’ कंपनीने देखील मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. मात्र ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनी कर्ज परतफेड करण्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे कंपनीचे कर्जदाते कंपनीच्या लिलावासाठी NCLT मध्ये गेले आणि आता कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहे.
अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या लिलावात ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ ग्रुपने 8,640 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली जाहीर केली होती. तथापि कंपनीच्या कर्जदारांच्या समितीने ही बोली मान्य न करता दुसरी बोली आयोजित निर्णय घेतला. त्यानंतर हिंदुजा समूहाच्या ‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स’ कंपनीने नवीन बोली लावली. त्या विरोधात ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट’ फर्मने एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स फर्मने NCLT ला नवीन लिलावासाठी बोली आयोजित करण्याच्या योजनेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. नंतर IIHL ने NCLT च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका NCLAT या अपीलिय न्यायाधिकरणात दाखल केली. सध्या प्रकरण प्रलंबित आहे. आणि रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोर कंपनीवर एकूण 40,000 कोटी रुपये कर्ज आहे, जे कंपनी परतफेड करण्यात अयशस्वी ठरली आहे.
‘रिलायन्स कॅपिटल’ शेअर्सची कामगिरी :
सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 10 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे 36.93 टक्के नुकसान केले आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 97.89 टक्के कमजोर झाले आहेत. याकाळात कंपनीचे शेअर किंमत 410 रुपये वरून घसरून 9 रुपये किमतीवर आले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.