 
						Reliance Industries Share Price | ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5000 रुपयेवर जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. इक्वोनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायझरी फर्मच्या तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 4-5 वर्षात ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 100 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2476.20 रुपये किंमत पातळीचर ट्रेड करत होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक रेटिंग :
तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनी भारतातील सर्वात जास्त बाजार भांडवल असलेली कंपनी मानली जाते. ही कंपनी एक मिनी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपले सर्व व्यवसाय एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून नवीन युगातील ई कॉमर्स कंपन्याच्या तुलनेत तज्ञ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी RIL कंपनीचे शेअर्स पुढील 4-5 वर्षांसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायाचा महसूल आणि नफा अनेक पटींनी वाढवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपला व्यवसाय अक्षय हरित ऊर्जा, FMCG, मीडिया, वित्तीय सेवा व्यवसायात देखील विस्तार करत आहे.
कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या व्यवसायात अनेक पटींनी वाढ करण्याची क्षमता आहे. तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी पुढील 4-5 वर्षात एक छोटी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकते. गुंतवणुकदार 100 टक्के परताव्याच्या अपेक्षेने 4-5 वर्षांसाठी स्टॉक होल्ड करु शकतात.
परकीय ब्रोकरेज हाऊस जेफरीज फर्मने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबत तज्ञांनी स्टॉकवर 3125 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. वाढीव ट्रेण्ड मध्ये या कंपनीचे शेअर्स 3450 रुये किंमतीवर जाऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2817.35 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2180 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		