
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6.36 टक्क्यांच्या वाढीसह 177.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स करेक्शन मोडमधे ट्रेड करत आहेत. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये 150 रुपये किंमत पातळीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 170.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये 165 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमधे 178 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. पुढील काळात रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 155 रुपये ते 200 रुपये असेल.
टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मंदीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 182 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 182 रुपये किमतीच्या पार गेला तर, अल्पावधीत शेअर 228 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. एलकेपी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 145.150 रुपयेपर्यंत घसरू शकतो.
एप्रिल 2024 या महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 308 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 131 रुपये होती. काही वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 2400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
कर्जबाजारी झाल्यामुळे या कंपनीचे अक्षरशः दिवाळे निघाले. ही कंपनी मुख्यतः वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. मार्च 2024 पर्यंत या कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 16.50 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 83.39 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.