2 May 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त घसरले होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह 227.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस प्रकरणात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या विरोधात निकाल दिला आहे. यामुळे कंपनीला 8,000 कोटी रुपयेचा फटका बसला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )

2008 मध्ये रिलायन्स इन्फ्रा कंपनीची उपकंपनी असलेल्या DAMEPL आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात ‘सवलत करार’ मुळे उद्भवलेल्या वादाचे प्रकरण कोर्टात गेले होते. कोर्टाने DAMEPL कंपनीला लवादाने दिलेल्या निकालानुसार दिल्ली मेट्रो रेल्वेने जी अनामत रक्कम भरली होती, ती परत करण्यास सांगितली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 12.13 टक्के घसरणीसह 200 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सेबीला माहिती दिली की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रिलायन्स इन्फ्रा कंपनीवर कोणताही प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्पष्ट केले की, 10 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचा कंपनीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

रिलायन्स इन्फ्रा कंपनीला लवादाच्या निवाड्या अंतर्गत DMRC/DAMEPL कडून कोणतेही पैसे मिळालेले नाहीत”. जरी DAMEPL ही कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असली तरी ती एक वेगळी युनिट आहे.

मागील काही काळापासून सुरू असलेल्या शानदार तेजीनंतर रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 20 टक्क्यांनी घसरला आहे. टिप्स 2 ट्रेड्सच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये 280 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. नजीकच्या काळात हा स्टॉक 193 रुपये किमतीवर जाण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून शेअरची किंमत 90 टक्के घसरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 12 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x