Reliance Infra Share Price | दिग्गजांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअरची खरेदी, संधी सोडू नका, यापूर्वी दिला 2235% परतावा

Reliance Infra Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 9 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 2235 टक्के नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 213.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 214.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23.35 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 147.75 रुपयेवरून वाढून 214.85 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 137 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 134.85 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 4000000 शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील हिस्सेदारी 1.01 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 24 June 2024.