 
						Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 23.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मगील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 50.79 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.49 टक्के घसरणीसह 23.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
YTD आधारे रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62.59 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 92 टक्क्यांनी घसरले आहेत. 2008 साली रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 255 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 23 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कालावधीत दीर्घकालीन गुंतवणुकदारांना तब्बल 91 टक्के तोटा झाला आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. सप्टेंबर तिमाहीत उच्च महसुलामुळे रिलायन्स पॉवर कंपनीचा निव्वळ तोटा 237.76 कोटी रुपये इतका कमी झाला आहे. सेबी फाइलिंगनुसार मागील वर्षी रिलायन्स पॉवर कंपनीचा निव्वळ तोटा 340.26 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील वर्षी रिलायन्स पॉवर कंपनीचे उत्पन्न 1,945.14 रुपये नोंदवले गेले होते, जे या तिमाहीत वाढून 2,130.83 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. रिलायन्स पॉवर ही दिवाळखोर कंपनी रिलायन्स समूहाचा भाग होती, जी भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती आणि कोळसा संसाधन म्हणून व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		