
Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 22.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 10.22 टक्के वाढीसह 22.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 1 रुपयेवरून वाढून 22 रुपयेवर पोहोचली आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 22.46 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 1870 टक्के नफा कमावून दिला आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 99 टक्के कमजोर झाले होते. मात्र आता या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. 23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 रोजी हा स्टॉक 1.13 रुपये किमतीवर आला होता.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 22.46 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 8 महिन्यांत 145 टक्क्यांनी वाढली आहे. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर13 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 22.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 17.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.