
Reliance Power Share Price | ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 12.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे. बुधवारी अनिल अंबानींची मालकी असलेल्या ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 12.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स पॉवर कंपनीने मार्च 2023 या तिमाहीत 321.79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सेबीला दिलेल्या माहितीत रिलायन्स पॉवर कंपनीने कळवले की, आर्थिक वर्ष 2021 22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीला 657.89 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने एकूण 1,856.32 कोटी रुपये कमाई केली आहे.
मागील वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीची एकूण कमाई 1,878.40 कोटी रुपये होती. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच ‘पुनीत नरेंद्र गर्ग यांची’ यांना अतिरिक्त संचालक ‘नॉन – एक्झिक्युटिव्ह नॉन-डिपेंडेंट’ म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या शेअर्सची वाटचाल :
2008 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 2200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 12.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या काळात हा स्टॉक 99 टक्के कमजोर झाला आहे. मागील पाच एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. यावर्षी YTD आधारे शेअरची किंमत 16.67 टक्के घसरली आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील पाच वर्षांत 65.78 टक्के घट पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 24.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. रिलायन्स पॉवर कंपनीचे बाजार भांडवल 4,575.63 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.