Reliance Power Share Price | शेअर प्राईस 25 रुपये! कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक ‘BUY’ करावा की ‘Sell’

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 25.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर स्टॉकमधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल निराशाजनक आले आहे. किंबहुना मार्च तिमाहीत ही कंपनी नफ्यातून तोट्यात गेली आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.40 टक्के वाढीसह 25.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील सहा महिन्यांत रिलायन्स पॉवर स्टॉक 24 टक्के वाढला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 13 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8.16 टक्के घसरली आहे.

मागील पाच वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 293.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक 90 टक्के खाली आला आहे.

रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला मार्च 2024 तिमाहीत 397.66 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 321.79 कोटी रुपये नफा कमावला होता. या कंपनीचे एकूण उत्पन्न जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत 2,193.85 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 1,853.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मार्च तिमाहीत कंपनीचा इंधन खर्च वाढून 953.67 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जानेवारी-मार्च तिमाहीत या कंपनीचा खर्च 823.47 कोटी रुपये नोंदवला गेला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीला 2,068,38 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीचा तोटा 470.77 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Reliance Power Share Price today on 29 May 2024