
Reliance Power Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला. सलग दोन दिवस शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. मार्केट निफ्टी 37 अंकांच्या तेजीसह 23,213 वर पोहोचला होता, तरसेन्सेक्स 224 अंकांच्या तेजीसह 76,724 वर पोहोचला होता. या तेजीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरमध्ये देखील किंचित तेजी पाहायला मिळाली होती.
रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 0.82 टक्क्यांनी वाढून 39.20 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 53.64 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 19.40 रुपये होता. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 15,759 कोटी रुपये आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात 17 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स पॉवर शेअरचे मूल्यांकन २०२४ मधील 53.64 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ३० टक्क्यांनी घसरले आहे.
रिलायन्स पॉवर कंपनीच्या कर्जात लक्षणीय घट आणि बॅलेन्सशीट सकारात्मक
गेल्या काही वर्षांत बॅलेन्सशीट मधील सकारात्मक सुधारणांमुळे रिलायन्स पॉवर शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनीच्या कर्जात लक्षणीय घट झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वाढला आहे. तसेच, अलीकडच्या काही वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीला अक्षय ऊर्जा क्षेत्रातही असंख्य कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत आणि ज्यामुळे शेअर्स खरेदी वाढली आहे.
रिलायन्स पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
शेअर बाजार विश्लेषक ध्वनी पटेल यांच्या मते, ‘रिलायन्स पॉवर कंपनी शेअर्स २०२३ पासून मजबूत तेजीत ट्रेड करत आहेत. रिलायन्स पॉवर शेअरने अलीकडेच उच्चांकापासून 30 टक्क्यांच्या घसरणीनंतर चॅनेल सपोर्ट लेव्हलवरून पुनरागमन केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनी शेअर काही काळ प्रमुख तांत्रिक निर्देशांक बोलिंजर बँडच्या खाली गेला होता आणि नंतर शेअरने पुन्हा उसळी घेतली, असे ध्वनी पटेल यांनी म्हटले.
रिलायन्स पॉवर शेअर टार्गेट प्राईस
रिलायन्स पॉवर कंपनी शेअर्समध्ये गुंतणूकदारांकडून नव्याने खरेदी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. खरेदीचा हा ट्रेंड संभाव्य उलटफेराचे संकेत देते आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स पुन्हा तेजीने वाढू शकतो आणि ४८ रुपयाच्या टार्गेट प्राईसपर्यंत पोहोचू शकतो, असे ध्वनी पटेल यांनी म्हटले आहे.
एफआयआय’ने रिलायन्स पॉवर शेअर्समधील हिस्सेदारी वाढवली
एफआयआय’ने रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. सप्टेंबर 2024 तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचा हिस्सा जून 2024 तिमाहीतील 12.71 टक्क्यांवरून 13.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा २३.२६ टक्के आहे, तर विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड कंपन्यांचा हिस्सा सुमारे ३ टक्के आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.