
Reliance Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट चढ-उतारनंतर घसरणीसह बंद झाला होता. अनेक लार्जकॅप शेअर्स मागील काही दिवस (NSE: RELIANCE) घसरत आहेत. लार्जकॅप शेअर्सपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञ सकारात्मक संकेत देत आहेत. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
शेअर उच्चांकी पातळीवरून 21 टक्क्यांनी घसरला
ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. एकूण मार्केट कॅपनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा शेअर त्यांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून २१ टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ महिन्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर सातत्याने घसरत आहे.
शेअर दैनंदिन चार्ट
शेअर दैनंदिन चार्टवर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या त्याच्या प्रमुख शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म मूव्हिंग ऍव्हरेज म्हणजेच 10-दिवस, 20-दिवस, 50-दिवस, 100-दिवस आणि 200-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे. तसेच, शेअर साप्ताहिक चार्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर अद्याप त्याच्या 200 दिवसांच्या ईएमएच्या वर ट्रेड करत आहे.
शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 11 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.59 टक्के घसरून 1,276.15 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 8 जुलै 2024 रोजी 1608.80 रुपयांचा उच्चांक गाठला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ११४९.०३ रुपये आहे.
AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर प्राईसच्या घसरणीनंतर ब्रोकरेज फर्म रिव्हर्सलचे संकेत देत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरच्या किंमतीत गेल्या २८ ट्रेडिंग सेशनपासून घसरण सुरु आहे. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण मार्केट कॅप ४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.मात्र, ब्रोकरेज फर्म या शेअरबाबत सकारात्मक संकेत देत आहेत. AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1779 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.