
Reliance Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ (NSE: RELIANCE) झाली आहे. या तेजीचा सकारात्मक परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
शेअर्सची सध्याची स्थिती
मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 0.57 टक्के वाढून 1,280 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर जुलैपासून घसरत आहेत. गेल्या महिनाभरात शेअर ८ टक्क्यांनी घसरला असून, तो निफ्टी ५० निर्देशांकातील प्रमुख अंडरपरफॉर्मर कंपन्यांपैकी एक आहे.
शेअर चार्ट संकेत
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर चार्टवर नजर टाकली तर शेअर १,६०८ रुपयांच्या पातळीवर पोहोचल्यानंतर घसरत आहे आणि सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर २०० दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या १,६०८ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून २० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बोनस इश्यूनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची ही उच्चांकी पातळी होती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने ऑगस्टमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. दरम्यान, ब्रोकरेज फर्मने शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले आहेत.
AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरबाबत सरकारात्मक संकेत देताना खरेदीचा सल्ला दिला आहे. AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS कॅपिटल ब्रोकरेज फर्मने या शेअरला 1779 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.