Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार – NSE: RELIANCE

Reliance Share Price | शुक्रवारी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सपाट ओपनिंगनंतर उत्तरार्धात प्रचंड घसरण झाली आणि सलग पाचव्या दिवशी घसरणीनंतर स्टॉक मार्केट एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 364 अंकांनी घसरून 24,587 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स ११७६ अंकांनी घसरून ७८,०४१ वर बंद झाला होता. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स २०२४ मध्ये नकारात्मक परताव्यासाठी फोकसमध्ये आले आहेत. मागील १० वर्षात प्रथमच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या गुंतवणूकदारांना एखाद्या वर्षात तोटा सहन करावा लागत आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे थांबलेली तेल अदलाबदल व्यवस्था पुन्हा सुरू

आता रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कारण, व्हेनेझुएलाची सरकारी तेल कंपनी पीडीव्हीएसए आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे थांबलेली तेल अदलाबदल व्यवस्था पुन्हा सुरू झाल्याने शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. पीडीव्हीएसएच्या अंतर्गत दस्तऐवजानुसार, जुलै महिन्यात दिलेल्या अमेरिकेच्या परवान्यानंतर ही नवीन अपडेट समोर आली आहे.

Reliance Industries Share Price – NSE: RELIANCE

स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअर बाजार विश्लेषक नुरेश मेराणी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर्ससाठी 1,320 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 1220 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या 1,206 रुपयांवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4449 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 5.67% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 1.39% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 18.17% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 4.56% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 52.27% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,449.23% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 6.88% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Friday 20 December 2024 Marathi News.