Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, तेजी पाहून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Reliance Share Price | भारतातील तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18 लाखांपेक्षा अधिक वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील सर्वोच्च मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्येही सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2.66 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.36 टक्के वाढीसह 2,729.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 18.3 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहे. बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2658.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स स्टॉक 2661.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता.

मागील पाच दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2602.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 2700 रुपयेच्या पार गेला आहे. मागील एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने लोकांना 12.24 टक्के नफा मिळवून दिला आहे.

ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना फारसा फायदा झाला नाहीये. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 12 जुलै 2023 रोजी रिलायन्स कंपनीचे शेअर्स 2767.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. मागील एका वर्षात देखील या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 9.89 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 131.50 टक्के वाढली आहे.

मॉर्गन स्टॅन्ले फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा स्टॉक 2,716 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काही दिवसात 2,821 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. Goldman Sachs फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टारगेट प्राइस 2,660 रुपयेवरून वाढवून 2,885 रुपये केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी 2022 च्या एजीएममध्ये विधान केले होते की, 2027 पर्यंत रिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल दुप्पट होईल. रिलायन्स समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा वाटा सर्वाधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 12 January 2024.