
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 2957 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
29 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 19 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श केला होता. अवघ्या दोन आठवड्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल एक लाख कोटी रुपये वाढले आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.080 टक्के वाढीसह 2,932.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी मुख्यतः तेल आणि दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. 2005 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख रुपये होते. 2019 मध्ये या कंपनीने 10 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला होता. YTD आधारे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 19641 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1.2 टक्के घट झाली आहे. जेफरीज फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकची टारगेट प्राईस 3140 रुपये जाहीर केली आहे. तर मॉर्गन स्टॅन्लेने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर 2821 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 2910 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.