
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1543.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1604 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 723 रुपये होती. Reliance Industrial Infra Share Price
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा एक भाग आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 1,498.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 194 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1543.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 1356 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 3 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 384.80 रुपये किमतीवरून 1543.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
28 मार्च 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 732.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्टॉक 1543.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 6 महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 966.60 रुपयेवरून वाढून 1543.90 रुपये किमतीवर पोहचले आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2240 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 45.43 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.