
Reliance Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 14 अंकांच्या घसरणीसह 79229 अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी निर्देशांक 15 अंकांच्या वाढीसह 24059 च्या पातळीवर पोहचला होता. दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3275 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.6 टक्क्यांच्या वाढीसह 3111 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही लार्ज कॅप कंपनी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी 1973 पासून शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2088799.34 कोटी रुपये आहे. कंपनी मुख्यतः पेट्रोकेमिकल्स, तेल, वायू आणि आर्थिक सेवा आणि रिटेल क्षेत्रात व्यवसाय करते.
आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 241067 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्यात कंपनीचा निव्वळ नफा 21143 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 22.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 16.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.