
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 3,217.60 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसात 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.043 टक्के वाढीसह 3,041.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात 22 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले होते. एप्रिल-जून 2024 तिमाहीत या कंपनीच्या एकत्रित नफ्यात 5.5 टक्के घसरण झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 15,138 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे रिटेल, दूरसंचार आणि ऑईल-टू-गॅस व्यवसाय नफ्यात आहेत. मात्र ऑईल-टू-केमिकल विभागातील कमकुवत कामगिरी आणि उच्च घसारा खर्चामुळे कंपनीच्या नफ्यात घसरण झाली आहे.
सोमवार दिनांक 29 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. जून तिमाही निकालानंतर या स्टॉकमध्ये सलग 3 दिवस घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी हा स्टॉक 0.76 टक्के वाढून 3,041 रुपये किमतीवर पोहचला होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 8.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने जून तिमाहीत 2,35,767 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीमध्ये कंपनीची कमाई 2,41,067 कोटी रुपये होती म्हणजेच तिमाही दर तिमाही आधारावर कंपनीच्या महसुलात 2.20 टक्क्यांची घट झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकानात 11.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 2,11,372 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत या कंपनीचा PAT 17,448 कोटी रुपयेवर आला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20,57,856.04 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 17.5 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20.35 टक्के, दोन वर्षात 31.4 टक्के आणि 3 वर्षात 60.4 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 175 टक्के आणि 10 वर्षांत 562 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.