
Remedium Lifecare Share Price | ‘रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्के एवढा प्रचंड बंपर परतावा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मंगळवार दिनांक 9 मे रोजी रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.75 टक्के वाढीसह 2,070.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 25 मे , 2018 रोजी ,या कंपनीचे शेअर्स 12.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 16,328.57 टक्के वाढवले आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आ तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16,328.57 टक्के वाढून 1.64 कोटी रुपये झाले असते.
रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स अजूनही तेजीत वाढत आहेत. 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा स्टॉक 1,383.87 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,416.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15.16 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 2023 या वर्षाच्या सुरुवातीला रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.83 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.