
Rent House Right | जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला भाडेकरू म्हणून असलेले हक्क आणि सुविधांची माहिती असणे देखील गरजेचे आहे. याची माहिती नसल्याने अनेक भाडेकरू घरमालकाच्या अन्यायाच्या शिकारी बनतात. त्यामुळे आज या बातमिमधून घरमालक आणि भाडेकरू यांच्यासाठी असलेल्या नियमांची माहिती घेणार आहोत.
भाडेतत्वावर घर घेत असताना एक करार केला जातो. ज्याला रेंट ऍग्रीमेंट म्हणतात. यात अनेक मालक आपला कर वाचावा यासाठी कमी रक्कम नमुद करतात. याची माहिती भाडेकरूने ठेवली पाहिजे. तसेच काही घरमालक त्याला पैशांची अडचण असल्यास करारात ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त भाडे वसुलण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण नाहक त्रास देउन खुप कमी दिवसांत घर खाली करायला सांगतात. यामुळे अनेक भाडेकरूमची ऐनवेळी गोची होती.
भाडेकरूंना असा त्रास देणे मात्र कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मालकाला शिक्षा देखिल होऊ शकते. भाडे नियंत्रण कायदा कलम १९४८ मध्ये याचा उल्लेख केला आहे. घरमालकाच्या त्रासाला लगाम लावण्यासाठी तुम्हाला या कलमा विषयी माहिती असणे गरजेचे आहे. यामधे घर मालक आणि भाडेकरूचे हक्क आणि नियम नमुद केले आहेत.
कोरोना काळात अनेक नागरिक आपल्या गावी परतत होते. त्या काळात अनेकांच्या भाड्यावर देखील सुट होती. मात्र कोरोना संपल्यावर अनेक घर मालकांनी भाडेकरूंकडून ज्यादाचे घरभाडे वसुल करायला सुरूवात केली. त्यामुळे भाडेकरूंना खूप त्रास सहन करावा लागला.
जेव्हा तुम्ही घर भाड्याने घेता तेव्हा त्यावर लिहिलेल्या सर्व गोष्टी निट वाचून झाल्यावरच सही करावी. अनेक करारांमध्ये भाडे भरण्यास २ महिन्यांचा उशीर झाल्यावर कारवाईचे आदेश नमुद असतात. असे असेल तर तुम्हाला भाड्याचे पैसे चुकवून चालणार नाही. जर तसे झाले तर घरमालकाने उचललेले पाऊल योग्य ठरते.
भाडेकरूला घरमालक जेव्हा घर खाली करायला सांगतो तेव्हा १५ दिवस आधी नोटीस द्यावी लागते. तसे न केल्यास घर मालक १५ दिवसांच्या आत भाडेकरूला घरा बाहेर काढू शकत नाही. हा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा भाडेकरारात पुढील गोष्टी नमुद असतात.
1 भाडेकरूने २ महिने सलग थकवू नये.
२. सलग दोन महिने भाडे थकवल्यास त्याला नोटीस बजावली जाईल.
३. नोटीसचा कालावधी १५ दिवसांचा असेल.
४. १६ व्या दिवशी भाडेकरूला घर खाली करावे लागेल.
घरमालकाने भाडेकरूला फक्त राहायला घर नाही तर पाणी, वीज, स्वच्छता, ,पार्कींगची व्यवस्था या गोष्टी देखील पूरवणे गरजेचे आहे.
घर भाड्याने घेत असताना त्याची मर्यादा निश्चितपणे पाठवा. जर भाडेकरूचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांना बाहेर काढले जाऊ नये. घराची देखभाल आणि आगाऊ दिलेली रक्कम लिहून ठेवा. तसेच या सर्व गोष्टींबरोबर गोपनीयते विषयी मालकाशी चर्चा करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.