3 May 2025 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Reverse Mortgage Loan | तुमच्या पालकांचा सांभाळ करा, अन्यथा आई-वडील स्वतःच्या घरासंबंधित हा निर्णय घेण्याचं प्रमाण वाढतंय, नक्की वाचा

Reverse Mortgage Loan

Reverse Mortgage Loan | म्हातारपणाच्या आधारासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुंतवणूक करुण ठेवतो. मात्र अनेकांना काही कारणास्तव असे करता येत नाही. प्रत्येक जण आपल्याकडे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहतो. यासाठी बॅंक लोन देते. मात्र आता तुमच्या म्हातारपणात तुमच्याकडे काहीच आधार नसतान बॅंक तुम्हाला तुमच्या घरावर देखील लोन देते. याच्या आधारे तुम्ही मरेपर्यंत आरामात आयुष्य जगू शकता.

बॅंका आपल्याला घर खरेदी करताना जे कर्ज देतात त्याला होम लोन म्हणतात. तसेच हे कर्ज तुमच्याकडून काही कालावधी निश्चीत करत ईएमआय स्वरूपात परत केले जाते. यात तुम्हाला दर महा हप्ते भरून कर्ज फेडावे लागते. तर म्हातारपणी तुम्हाला रिव्हर्स लोन म्हणजेच रिव्हर्स मॉर्गेज दिले जाते. यासाठी तुम्हाला कोणतेही हप्ते भरण्याची गरज नसते.

यात बॅंक तुमच्या घराचे सर्व कागदपत्र स्वत:कडे घेते. तसेच तुम्हाला उदरनिर्वाहासाठी एक रकमी किंवा दर महा पैसे देते. एकंदर बॅंक तुम्हाला तुमच्या घराच्या परताव्यात संभाळत असते. तुम्ही मरे पर्यंत तुम्हाला घरावर पैसे पुरवले जातात. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते घर बॅंक स्वत:च्या ताब्यात घेते. तुम्हाला मिळणारे रिव्हर्स लोन हे तुमच्या घराच्या किंमतीवर अवलंबून असते.

घराच्या किंमतीच्या ६० टक्के रिव्हर्स कर्ज मिळवता येते. यात एकप्रकारे तुमचे घर गहन ठेवलेले असते. अनेक अशी वृध्द जोडपी आहेत जी एकटी राहतात. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे कोणीच नसते. त्यामुळे म्हातारपणी उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. तसेच ज्यांची मुलं त्यांच्या घरापासून दूर राहतात आणि त्यांना पुन्हा ते घर नको असते.  अशा व्यक्ती हे कर्ज मिळवून सुखी अयुष्य जगू शकतात.

यात मृत्यू पर्यंतचा उल्लेख असला तरी हे कर्ज फक्त १५ वर्षांसाठी दिले जाते. त्यामुळे याचा लाभ घेणा-यांचे वय ६० च्या पुढे असणे बंधनकारक केले आहे. तसेच जर त्या वृध्द व्यक्तीने वयाची ७२ पूर्ण केली असेल तर त्यांना कोणतीही बॅंक हे कर्ज सहज उपलब्ध करुण देते. जर एखादे जोडपे यासाठी एकत्र अर्ज करत असतील तर पतीचे वय ६० आणि पत्नीचे वय ५८ असणे आवश्यक आहे.

अशात एखाद्या वृध्द दांपत्याने हे कर्ज घेतले असेल आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची मुलं किंवा इतर कोणी यावर त्यांचा हक्क दाखवत असतील किंवा ते घर त्यांना हवे असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तीला रिव्हर्स कर्जाची सर्व रक्कम बॅंकेला परत करावी लागेल. त्यानंतर बॅंक त्यांना घराचा ताबा देते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Reverse Mortgage Loan benefits for senior citizens check details 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reverse Mortgage Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या