 
						RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि मागील 2 वर्षात या स्टॉकची किंमत 2680 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 5000 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी RMC स्विचगियर्स लिमिटेड स्टॉक 0.76 टक्के घसरणीवसह 713.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
नुकताच RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीने सैनी कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. RMC स्विचगियर्स कंपनी आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन शेअर्सच्या बदल्यात एक मोफत बोनस शेअर देणार आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 हा दिवस बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
नुकताच RMC स्विचगियर आणि रेडियस एनर्जी इंटरनॅशनल यां दोन्ही कंपन्यांनी एक सामंजस्य करार संपन्न केला आहे. या करारात नॉलेज शेअरिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग, ग्लोबल आउटरीच फॉर IT ऑटोमेशन, सोल्युशन्स, टेक्नो कमर्शियल स्टडीज आणि अॅनालिसिस संबंधित कामे केली जाणार आहे. या कराराची मुदत 5 वर्ष असेल.
RMC स्विचगियर्स लिमिटेड ही कंपनी एक स्विच गियर अभियांत्रिकी कंपनी म्हणून वीज वितरण, पारेषण क्षेत्र आणि PV संगमरवरी आणि घन पृष्ठभागासाठी ECI संबंधित व्यवसाय करते. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीने 180 टक्के वाढीसह 67 कोटी रुपयेची विक्री नोंदवली आहे.
RMC स्विचगियर्स या कंपनीने 6 कोटी रुपये निव्वळ कमावला आहे. RMC स्विचगियर्स ही कंपनी स्मार्ट ऊर्जा मीटर, वीज वितरण बॉक्स आणि पॅनेल बनवण्याचे काम करते. यासह, ही कंपनी आरएमसी स्विचगियर्स इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट बनवण्याचे देखील काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		