
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी गर्दी केली. मागील आठवड्यात कंपनीच्या शेअर्सनी दोन वेळा अप्पर सर्किट तोडले होते. तर शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी देखील आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरची किंमत 4.81 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.
1 वर्षात 168.28 टक्के परतावा
1 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी RO Jewels कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 62.30 टक्के वाढले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी आरओ ज्वेल्स स्टॉक खरेदी करून होल्ड केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 168.28 टक्के वाढले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41.59 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे.
जबरदस्त तिमाही निकालानंतर तेजी
2021-22 या आर्थिक वर्षात आरओ ज्वेल्स कंपनीने 46.79 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलात 506.52 टक्के वाढ झाली आहे. तर वार्षिक आधारावर आरओ ज्वेल कंपनीच्या महसुलात 900 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा EBIDTA 1000 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये 1050 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.