 
						RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला पूर्व रेल्वेकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये माती भरण्यापासून ते पूल बांधण्यापर्यंत तसेच रेल्वे रुळ टाकण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट ८३७.६७ कोटी रुपयांचा आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी आरव्हीएनएल शेअर 0.095 टक्के वाढून 422.25 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
कॉन्ट्रॅक्टबद्दल अधिक माहिती
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा प्रोजेक्ट कालीपहाडी आणि प्रधानखुटा दरम्यान आयआर चॅनेल 205.0 किलोमीटर ते 260.2 किलोमीटर पर्यंत कव्हर करतो आणि मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे बीजी लाइनच्या बांधकामाचा एक भाग आहे.
आरव्हीएनएल कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये मातीकाम, छोटे-मोठे पूल बांधणे, कोरेकाम, संरक्षक भिंती, पाण्याचा निचरा आणि लेव्हल क्रॉसिंग यांचा समावेश आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी एससीपीएलसह संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून प्रोजेक्टचे नेतृत्व करीत आहे. त्यात रेल्वे विकास निगम लिमिटेडचा ७४%, तर एससीपीएलचा २६% हिस्सा आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला हा प्रोजेक्ट ३६ महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. संयुक्त उपक्रमातील रेल्वे विकास निगम लिमिटेडचा नियंत्रक हिस्सा प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनीची प्रमुख भूमिका दर्शवितो.
कमी ऑपरेटिंग मार्जिन आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे रेल्वे विकास निगम लिमिटेडचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३९४.३ कोटी रुपयांवरून २७ टक्क्यांनी घसरून २८६.९ कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीतील ४,९१४.३ कोटी रुपयांच्या तुलनेत आरव्हीएनएल कंपनीचा महसूल १.२ टक्क्यांनी घटून ४,८५५ कोटी रुपयांवर आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		