8 September 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News
x

RVNL Share Price | रेल्वे स्टॉक स्पेशल अपडेट! RVNL सह कोणते PSU शेअर्स पुन्हा मालामाल करणार?

RVNL Share Price

RVNL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले IRFC, RVNL, IRCON या सर्व कंपन्याचे शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरले होते. जागतिक नकारात्मक संकेत, परकीय गुंतवणुकीचे निर्गमन आणि मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे शेअर बाजारात मंदी आली आहे. याचा परिमाण भारतातील सरकारी कंपन्याच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. यामधे रेल्वे स्टॉक सर्वात जास्त प्रभावित झालेले आपण पाहू शकतो.

आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 15 जुलै रोजी 229 रुपये किमतीवर पोहचले होते. या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्के घसरला आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.29 टक्के घसरणीसह 177.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 15 जुलै रोजी 647 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 16 टक्के घसरला आहे.

आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.16 टक्के वाढीसह 551.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 351.65 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 24 टक्के खाली आले आहेत. तर RailTel कंपनीचे शेअर्स 618 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवरून 24 टक्के खाली आले आहेत.

RailTel कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांकावरून 24 टक्के घसरून देखील किंमत-ते-कमाईच्या तुलनेत 38.9 पटीने अधिक किमतीवर ट्रेड करत आहेत. RVNL स्टॉक आपल्या किंमत-ते-कमाईच्या तुलनेत 71.2 पट अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 24 टक्के खाली आले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या किंमत-ते-कमाईच्या तुलनेत 15.1 पट अधिक किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात IRCTC कंपनीचे शेअर्स 7 टक्के घसरले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x