1 March 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | चमत्कारी ICICI म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 1 लाख रुपयावर मिळाला 75 लाख परतावा Post Office Interest Rate | कुटुंबाचा महिना खर्च व्याजावर भागवेल ही योजना, बचतीवर महिना 9250 रुपये मिळतील SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 'या' 3 एसबीआय SIP योजना मोठा परतावा देतील, वेळ न घालवता बचत सुरु करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
x

RVNL Share Price | मालामाल शेअर! RVNL कंपनीला आणखी एक ऑर्डर मिळाली, शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस किती?

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 400 टक्के मजबूत झाले आहेत. आता पुन्हा एकदा या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, पश्चिम रेल्वे विभागांच्या कामासाठी कंपनीने सर्वात कमी बोली लावून ऑर्डर आपल्या ताब्यात घेतली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 245.7 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्याची मुदत दोन वर्ष असेल. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 170.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

RVNL कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डरनुसार कंपनीला वडोदरा विभागातील नडियाद आणि पेटलाड दरम्यान सिव्हिल इंजिनीअरिंगचे काम आणि ट्रॅकचे काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय रेल विकास निगम लिमिटेड कंपनी मातीकाम ब्लॅकेटिंग रिटेनिंग वॉल, स्टेशन इमारत, प्लॅटफॉर्म, स्टाफ क्वार्टर तयार करणे यासारखे काम देखील देण्यात आले आहे.

या संपूर्ण ऑर्डरचे मूल्य 245.7 कोटी रुपये असून, कामाचा कालावधी 2 वर्ष आहे. या ऑर्डरची पूर्तता रेल विकास निगम लिमिटेड आणि एमपीसीसी हे संयुक्तपणें करणार आहेत. या कामात रेल विकास निगम कंपनी वाटा 74 टक्के आणि MPCC चा वाटा 26 टक्के असेल

मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 32.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 164 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 32.80 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x