
RVNL Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 2.25 टक्क्यांनी घसरून 409.75 रुपयांवर पोहोचला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 85,069 कोटी रुपये आहे. रेल विकास निगम कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 647 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 213.05 रुपये होती.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज
12 एप्रिल 2019 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 19.75 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 409.75 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 419.20 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 398.65 रुपये ते 423.00 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 213.05 रुपये ते 647 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ अक्षय पी भागवत यांनी आरव्हीएनएलव शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. अक्षय पी भागवत म्हणाले की, ‘गेल्या चार ते पाच महिन्यांत आरव्हीएनएल सहित रेल्वे क्षेत्रातील अनेक शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. मात्र आगामी रेल्वे बजेटनंतर या शेअर्समध्ये तेजी दिसू शकते. परंतु आरव्हीएनएल कंपनी शेअर्समध्ये मध्यम ते लॉन्ग टर्ममध्ये फारशी तेजी दिसण्याची शक्यता नाही, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
आरव्हीएनएल कंपनी शेअर्सबाबत सल्ला देताना तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, ‘रेल्वे बजेटनंतर आरव्हीएनएल शेअरमध्ये तेजी दिसल्यास गुंतवणूकदारांनी ४५० ते ४६० रुपयांच्या वरच्या पातळीवर बाहेर पडावे. जर आरव्हीएनएल शेअर ४५० ते ४६० रुपयांच्या वरच्या पातळीवर गेला नाही आणि शेअर ३५० रुपयांच्या खाली घसरू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारांनी ३५० रुपयांवर कडक स्टॉपलॉस ठेवावा.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने 3.15% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रेल विकास निगम कंपनी शेअर 4.62% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 34.35% घसरला आहे. मागील १ वर्षात रेल विकास निगम कंपनी शेअरने 41.90 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात रेल विकास निगम कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 1,455.03 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने 1,974.68 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर शेअर 4.29% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.