
RVNL Share Vs IRFC Share | मागील एका वर्षभरात रेल्वे कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सर्वात पुढे आहेत. मागील वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
आता कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला 311 कोटी रुपये मूल्याचे नवीन कंत्राट मिळाले आहे. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 159.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
13 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीने सेबीला माहिती दिली की, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मध्य रेल्वे विभागाने बोगदा आणि पूल बांधण्याचे काम दिले आहे. या कंपनीला हे काम मध्य प्रदेश राज्यात करायचे आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला देण्यात आलेल्या या कामाचे एकूण मुल्य 311 कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कॉन्ट्रॅक्टमध्ये कंपनीला 1.6 किमी लांबीचे 4 बोगदे बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि या अंतर्गत कंपनीला एकूण 28 पूल बांधायचे आहे.
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 200 रुपयेपेक्षा कमी आहे. मागील एका वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 187 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मागील काही महिन्यापासून या रेल्वे कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.