 
						RVNL Vs IRCON Share | भारत सरकार ऑफर फॉर सेलद अंतर्गत IRCON कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. संस्थात्मक कोटा आणि किरकोळ कोटा अशा दोन्ही विभागांमध्ये IRCON स्टॉकची ऑफर फॉर सेल स्कीम ओव्हरसबस्क्राइब झाली आहे. या विक्रीमुळे भारत सरकारच्या तिजोरीत 1,100 कोटी रुपये जमा होणार आहेत.
भारत सरकार IRCON कंपनीतील 8 टक्के स्टेक म्हणजेच जवळपास 7.53 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत 154 रुपये किमतीवर खुल्या बाजारात विकणार आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी IRCON कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 163.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
भारत सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट टाकली की, IRCON कंपनीच्या OFS ला किरकोळ गुंतवणूकदारांनी 3.01 पट अधिक सबस्क्राईब केले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी IRCON इंटरनॅशनल कंपनीच्या 2,400 कोटी रुपये मूल्याच्या 15.66 कोटी शेअर्ससाठी बोली लावली होती. आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 4.63 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
सध्या भारत सरकारने IRCON या रेल्वे इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे 73.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. चालू आर्थिक वर्षात भारत सरकारने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील शेअर्स विकून 8,859 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने सार्वजनिक उपक्रमांचे शेअर्स विकून 51,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचे लक्ष ठेवले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		