13 December 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Sah Polymers IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत 61 ते 65 रुपये, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा

Sah Polymers IPO

Sah Polymers IPO | साह पॉलिमर्स या पॉलिमर उत्पादक कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. 4 जानेवारी 2023 पर्यंत हा IPO गुंतवणूकीसाठी खुला राहील. कंपनीने या IPO साठी शेअरची इश्यू किंमत 61 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. कंपनीला जेव्हा खुल्या बाजारातून भांडवल उभारणी करायची असते, तेव्हा खाजगी कंपन्या आपला IPO बाजारात आणतात, आणि गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price)

ग्रे मार्केटमध्ये शेअरची कामगिरी :
ग्रे मार्केटचे निरीक्षण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, 30 डिसेंबर 2022 रोजी ग्रे मार्केटमध्ये साह पॉलिमर्स कंपनीचे शेअर्स 6 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजच्या BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. या दिवशी शेअर स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंगला सुरूवात करेल.

IPO चे तपशील :
साह पॉलिमर्स कंपनी आपल्या IPO मध्ये 1,02,00,000 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स जारी करणार नाही. सॅट इंडस्ट्रीज ही साह पॉलिमर्सची प्रवर्तक कंपनी असून, त्यांच्याकडे या कंपनीचे 91.79 टक्के भाग भांडवल आहे. या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 75 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तर 15 टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के शेअर्सचा राखीव कोटा देण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sah Polymers IPO is open for Investment check listing date on 31 December 2022.

हॅशटॅग्स

Sah Polymers IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x