 
						SAMHI Hotels IPO | साम्ही हॉटेल्स कंपनीच्या IPO स्टॉकने शेअर बाजारात जबरदस्त पदार्पण केले आहे. साम्ही हॉटेल्स IPO स्टॉक 3.61 टक्के प्रीमियम वाढीसह 130.55 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते आणि काही तासात हा स्टॉक इंट्रा-डे ट्रेडमधे 133 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.
साम्ही हॉटेल्स कंपनीचे IPO शेअर्स NSE इंडेक्समध्ये 134.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशीच साम्ही हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी साम्ही हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 146 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
IPO तपशील
शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता लक्षात घेता, साम्ही हॉटेल्स कंपनीच्या IPO ने चांगली कामगिरी केली आहे, असे म्हणता येईल. साम्ही हॉटेल्स कंपनीचा IPO 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. साम्ही हॉटेल्स कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 119 रुपये ते 126 रुपये जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदाराला या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 14,994 रुपये जमा करावे लागले होते. गुंतवणूकदार एका वेळी कमाल 67 लॉट खरेदी करू शकत होते.
IPO ला मिळालेला प्रतिसाद
IPO ओपनिंगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी साम्ही हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 5.57 पट अधिक सबस्क्राईब झाले होते. IPO च्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांनी 0.07 टक्के IPO सबस्क्राईब केला होता. दुसऱ्या दिवशी या IPO ला 0.13 टक्के सबस्क्रिप्शन मिळाले होते.
IPO च्याशेवटच्या दिवशी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साम्ही हॉटेल्स IPO मध्ये सर्वाधिक बोली लावली होती. आणि शेवटच्या दिवशी या IPO ला 9.18 पट वर्गणी मागणी प्राप्त झाली होती. IPO पूर्वी या कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 616.55 कोटी रुपये भांडवल जमा केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		