
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन या ऑटो कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने संवर्धन मदरसन स्टॉक पुढील 3 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( संवर्धन मदरसन कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 156 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी संवर्धन मदरसन स्टॉक 4.26 टक्के वाढीसह 163.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ICICI डायरेक्ट फर्मने संवर्धन मदरसन स्टॉक पुढील 3 महिन्यांसाठी 147-152 रुपये रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 170 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक खरेदी करताना 138 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. 4 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 134 रुपये किमतीवर आले होते. ब्रोकरेज फर्मच्या मते, संवर्धन मदरसन स्टॉकमध्ये मोठी लवचिकता पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. त्यांनतर या शेअरने जबरदस्त रिकव्हिरी केली आहे.
संवर्धन मदरसन स्टॉकने नुकताच आपली 6 वर्षांची उच्चांक ब्रेकआउट किंमत टेस्ट केली आहे. या स्टॉकने 130 रुपये किमतीवर मोठा ब्रेकआउट दिला आहे, जो मजबूत वाढीचे संकेत देत आहे. मागील एका आठवड्यात संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3.6 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील दोन आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 25 टक्के वाढवले आहेत.
मागील तीन महिन्यांत संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात संवर्धन मदरसन स्टॉक 48 टक्के वाढला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 68 टक्के वधारली आहे. एका महिन्यापूर्वी ज्या लोकांनी हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 95 टक्के वाढले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.