24 January 2025 7:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC
x

Samvardhana Motherson Share Price | श्रीमंत करणाऱ्या शेअरची रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6 टक्के वाढीसह 185.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. 12 जूनपासून सलग चार ट्रेडिंग सेशनमध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे 13 टक्के वाढले होते. शेअरने लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना 231,937 टक्के परतावा दिला आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 124 टक्के वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 185.63 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2024 या वर्षात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने या कंपनीची रेटिंग Baa3 स्टेबल-इन्व्हेस्टमेंट ग्रेडमध्ये अपग्रेड केली आहे. कंपनीची आर्थिक रणनीती आणि जोखीम व्यवस्थापन, सुधारित आकार, स्केल आणि मजबूत आर्थिक मेट्रिक्स, चांगल्या प्रकारे अंमलात आणलेली अधिग्रहण धोरण, एकात्मिक अधिग्रहण, यामुळे तज्ञ स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचा निव्वळ नफा 699 कोटी रुपये होता. जो मार्च 2024 तिमाहीत वाढून दुप्पट झाला आहे. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 22,517 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत या कंपनीचा महसूल 27,058 कोटींवर पोहोचला होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने 1,670 कोटी रुपये नफा कमावला होता. तर 2023-24 मध्ये या कंपनीने 3,020 कोटी रुपये नफा कमावला होता. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने 78,788 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीने 98,692 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price NSE Live 20 June 2024.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x