
Sangam India Share Price | संगम इंडिया या कापड क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील 2 दिवसात 21 टक्के वाढले आहेत. संगम इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक झालेली वाढ, एका विशेष कारणामुळे पाहायला मिळत आहे.
दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक
दिग्गज गुंतवणूकदार ‘मधुसूदन केला’ यांच्या पत्नी ‘माधुरी केला’ यांनी संगम इंडिया कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. संगम इंडिया कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.3 टक्क्यांच्या वाढीसह 344 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 0.76 टक्के वाढीसह 324.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
संगम इंडिया स्टॉक वाढीचे कारण
माधुरी केला यांनी संगम इंडिया कंपनीचे 8.4 लाख अतिरीक्त शेअर्स खरेदी केले आहेत. ज्येष्ठ गुंतवणूकदार माधुरी मधुसूदन केला यांनी संगम इंडियाचे 8.4 लाख शेअर्स खरेदी करून कंपनीचे 1.67 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. माधुरी केला यांनी कापड आणि वस्त्र कंपनीतील हे भाग भांडवल सरासरी 268 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत.
संगम इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 359.95 रुपये होती. तर या, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 185 रुपये होती. माधुरी कैला यांच्याकडे 65 कोटी पेक्षा जास्त मूल्याचे 4 शेअर्स आहेत. माधुरी मधुसूदन केला यांनी 4 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या कॉर्पोरेट शेअर होल्डिंग डेटानुसार माधुरी केला यांची एकूण नेट वर्थ 65 कोटी पेक्षा जास्त होती.
संगम इंडिया कंपनीबद्दल थोडक्यात
संगम इंडिया ही कंपनी मुख्यतः कापडाचे उत्पादन, निर्यात आणि पुरवठा करण्याचे काम करते. ही कंपनी आशियातील पीव्ही डायड यार्नची सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत संगम इंडिया कंपनीने 30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत संगम इंडिया कंपनीच्या नफ्यात 44 टक्के घट पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत संगम इंडिया कंपनीने 54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.