
Sangam India Share Price | संगम इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळत आहे. शेअर होल्डिंग डेटानुसार, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार माधुरी मधुसूदन केला यांनी संगम इंडिया कंपनीमधील आपली होल्डींग तिचा 4.18 टक्के वाढून वाढवून 5.85 टक्केवर नेली आहे. (Sangam Share Price)
संगम इंडिया या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,560.37 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी संगम इंडिया कंपनीचे शेअर्स 4.12 टक्के वाढीसह 332.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ट्रेंडलाइन डेटानुसार माधुरी केला यांच्या पोर्टफोलिओमध्ये 72 कोटी पेक्षा जास्त मूल्याचे चार स्टॉक आहेत. कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार माधुरी केला यांच्याकडे संगम इंडिया कंपनीचे 5.85 टक्के भाग भांडवल आहे. माधुरी केला यांच्या पोर्टफोलिओमध्ये IRIS बिझनेस सर्व्हिसेस, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि कोप्रान या कंपनीचे अनुक्रमे 5.54 टक्के, 1.65 टक्के, 1.04 टक्के भाग भांडवल आहेत.
2023 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात संगम इंडिया कंपनीच्या शेअर्सने 194.65 रुपये ही नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. संगम इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 358.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 194 रुपये होती.
ट्रेंडलाइन डेटानुसार संगम इंडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 50 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. संगम इंडिया कंपनीच्या शेअरचे RSI आणि MFI अनुक्रमे 53.2 आणि 68.1 वर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.