
Sarkari Bank Shares | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँकांचे समभाग, वित्तीय सेवा आणि अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकावर सर्वाधिक विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने मोठी पडझड पाहायला मिळाली. काल निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 3.35 टक्क्यांनी कमजोर झाला होता. या निर्देशांकातील 12 पैकी फक्त एका बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
काल शेअर बाजारातील घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांवर दबाव निर्माण झाला होता. UCO बँकेचे शेअर्स 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 30.10 रुपयांवर ट्रेड करत होते. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये 0.84 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 29.40 रुपयांवर क्लोज झाले. पंजाब अँड सिंध बँकच्या शेअरमध्ये ही टक्क्यांची पडझड झाली होती.
सरकारी बँकांच्या शेअरवर विक्रीचा दबाव :
बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 4.55 टक्क्यांच्या घसरणीसह 169.85 रुपयांवर क्लोज झाले. तर बँक ऑफ इंडियाचे शेअर्सदेखील 4.55 टक्क्यांनी पडले होते. SBI बँकेचे शेअर काल 3.70 टक्क्यांच्या कमजोरीसह 572.35 रुपयांवर क्लोज झाले होते. कॅनरा बँकेच्या शेअरची किंमत 3.51 टक्के आणि युनियन बँकेच्या शेअरची किंमत 2.29 टक्क्यांनी घटली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये ही विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. PNB बँकेचे शेअर्स अडीच टक्क्याच्या घसरणीसह 54.25 रुपयांवर क्लोज झाले होते. IOB आणि इंडियन बँकेचे शेअर्स ही या पडझडीपासून वाचू शकले नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.