27 July 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

Sarkari Share | बाब्बो! या सरकारी बँकांचे शेअर्स 54 ते 65 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, एफडी राहू दे, शेअर्सकडे बघा

Sarkari Share

Sarkari Share | 22 नोव्हेंबर 2022 रोजी निफ्टी PSU बँक इंडेक्समधील सरकारी बँकांचा निर्देशांक 3968.40 अंकावर ट्रेड करत होता. जून 2022 मधील 2283.85 अंकाच्या 52 आठवड्यांच्या नीचांक ट्रेडिंग पातळीच्या तुलनेत निफ्टी PSU बँक इंडेक्स आता 74 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. शेअर बाजार बंद होण्याच्या काही तास आधी Nifty PSU बँक निर्देशांक 3976.70 या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक ट्रेडिंग पातळीवर पोहोचला होता. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PSU बँकांच्या उत्तम कामगिरीमुळे निफ्टी PSU बँक निर्देशांकात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे.

PSU बँक निर्देशांक :
PSU बँक निर्देशांक म्हणजे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सची एकत्रित कामगिरी पाहणारा निर्देशांक. या निर्देशांकाद्वारे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील सूचीबद्ध बँका शेअर बाजारात एकत्रितपणे ट्रेडिंग करत असतात. या इंडेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक यासारख्या अनेक सरकारी बँकाचा समावेश होतो.

मागील एका महिन्यात Nifty PSU बँक निर्देशांकात 31 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. अवघ्या एका महिन्यात जिथे निफ्टी-50 इंडेक्समध्ये फक्त 2.8 टक्के वाढ झाली होती, तर दुसरीकडे Nifty PSU बँक निर्देशांक 31 टक्क्यांनी वधारला आहे. युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकाचे शेअर्स 54 ते 65 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र,पंजाब अँड सिंध बैंक, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँके या बँकांच्या शेअर्समध्ये 31 ते 40 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कमालीची कामगिरी केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निव्वळ नफ्यात 32 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली असून एकूण नफा 40,991 कोटी रुपयेपर्यंत गेला आहे. दुसऱ्या सहामाहीतही PSU बँकांकडून अशीच जबरदस्त कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Sarkari Shares of PSU Bank Index has increased on all time high on 23 November 2022

हॅशटॅग्स

#Sarkari Shares(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x