 
						Sat Industries Share Price | शेअर बाजारातील चढ उताराच्या काळात शुक्रवारी सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी पाहायला मिळाली आहे. सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 रुपये किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. (Sat Share Price)
मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.45 टक्के वाढीसह 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
27 एप्रिल 2023 रोजी, सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 56 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 90 टक्के नफा कमावला आहे. नुकताच फ्रेंच गुंतवणूक बँक Societe Generale ने सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी Societe Generale ने सॅट इंडस्ट्रीज मध्ये भाग भांडवल खरेदी केल्याने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली. मागील आर्थिक वर्षात सॅट इंडस्ट्रीज कंपनीचा व्यवसाय आणि निव्वळ नफा वाढला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट स्पर्श करत आहेत.
सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः उत्पादन, शिक्षण, भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक, देशांतर्गत, व्यापार आणि आयात-निर्यात संबंधित व्यवसाय करते. सॅट इंडस्ट्रीज कंपनी आपल्या सहयोगी युनिट्सद्वारे व्यवसाय करते. फ्रान्स स्थित सोसायटी जनरल फर्मच्या मते सॅट इंडस्ट्रीज कंपनीमधील त्यांची गुंतवणूक दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळवून देऊ शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		