 
						Save Money from Tax | नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. आपले ध्येय ठरविण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग ठरविण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या गुंतवणुकीचा आणि बचतीचा आढावा घेऊन पुढील तयारी करू शकता. तसेच नव्या वर्षाबरोबर इन्कम टॅक्सची चिंताही येणार आहे. अनेक जण एकाच वेळी कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पुरावे सादर करू लागतात. करबचत तसेच चांगला परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्यायही तुम्ही शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. अशाच 5 योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) :
आयकर कायद्याच्या कलम ‘८० सी’अंतर्गत तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते. या योजनेत तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते आणि चांगला परतावा मिळतो. सरकार समर्थित या योजनेचा परतावा दर सध्या ७.१ टक्के आहे.
टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड :
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) हा दुसरा पर्याय आहे. यातही तुम्ही ८०सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर दरवर्षी करसवलतीचा दावा करू शकता. बाजाराशी संबंधित ही योजना असेल तर तुम्हाला चांगला रिटर्नही मिळतो.
नॅशनल पेन्शन सिस्टीम :
बाजाराशी निगडित योजना असल्याने तुम्ही त्यातून चांगल्या परताव्याची अपेक्षा करू शकता. आपण २ लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा दावा करू शकता. ८० सीसीडी अंतर्गत १.५ लाख रुपये आणि सीसीडी (१ बी) अंतर्गत अतिरिक्त 50,000 रुपये.
विमा योजना :
तुम्ही विमा घेऊन तुमच्या मालमत्तेला संरक्षण देता. पण, या योजनांमुळे तुम्हाला कर आकारणीतही मदत होते. या योजनांसाठी भरलेला प्रीमियम करसवलतीसाठी वैध आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		