 
						SBFC Finance IPO | नुकताच शेअर बाजारात SBFC फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्याच्या शेअरचे वाटप गुरुवारी पूर्ण झाले आहेत. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO चा आकार 1,025 कोटी रुपये होता. आणि गुंतवणूकदारांनी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या तीन दिवसांत SBFC फायनान्स कंपनीचा IPO 74 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. SBFC फायनान्स कंपनीचा IPO 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 या काळात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (SBFC Finance Share Price)
SBFC फायनान्स या कंपनीने आपल्या IPO ची किंमत बंद 54 रुपये ते 57 रुपये निश्चित केली होती आणि एका लॉटमध्ये 260 शेअर्स जारी केले होते. संस्थात्मक बोलीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 203.61 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 51.82 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. वकिरकोळ गुंतवणूकदारांच्या राखीव कोट्यात एकूण 11.60 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच राखीव कोटा 6.21 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये SBFC फायनान्स कंपनीचे शेअर्स 38-40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील ग्रे मार्केट किंमत स्थिर होती, त्यात फारसा बदल पाहायला मिळाला नाही. SBFC फायनान्स कंपनीच्या शेअरची ग्रे मार्केट किंमत विचार घेतली तर हा स्टॉक 70 टक्के वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		