 
						SBI Bank Share Price | ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ म्हणजेच भारतातील सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या SBI बँकेच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत कमालीचा परतावा दिला आहे. अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे बँकिंग क्षेत्रावर नकारात्मक दबाव निर्माण झाला आहे. मागील तीन वर्षांत SBI बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये, SBI बँकेचे शेअर 180 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आता या शेअरने 500 रुपये किंमत पार केली आहे. सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी SBI बँकेचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 509.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. SBI बँकेचा स्टॉक सध्या 629.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 23 टक्के खाली आहे. (State Bank of India Limited)
इतर बँकांच्या तुलनेत SBI स्टॉक :
वार्षिक परताव्याच्या बाबतीत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चा शेअर ‘बँक ऑफ बडोदा’ आणि ‘पंजाब नॅशनल बँक’ च्या खूप मागे आहे. बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सनी मागील एका वर्षात लोकांना 51 टक्के परतावा कमावून दिला आहे. युनियन बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर पीएनबी आणि कॅनरा बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षात लोकांना अनुक्रमे 29 टक्के आणि 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.
SBI बँकेच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्म आणि तज्ज्ञांना विश्वास आहे की, पुढील काळात हा स्टॉक आणखी वाढणार आहे. परकीय ब्रोकरेज जेफरीजने आपल्या नुकताच जाहीर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, सध्या भारतीय बँकांचे मूल्यांकन खूपच आकर्षक असून SBI बँक टॉप बँकिंग स्टॉकपैकी एक आहे. टर्टल वेल्थ फर्मचे तज्ञ म्हणाले की, एसबीआय बँक स्टॉक हा आमच्या मते सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांपैकी एक असून आणि आमच्या टॉप 3 होल्डिंगपैकी एक आहे.
बँकिंग क्षेत्र विक्रीच्या दबावाखाली :
मोतीलाल ओसवाल फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, जागतिक बँकिंग प्रणाली मुख्यत्वे मालमत्तेच्या गुणवत्तेपेक्षा तरलतेमुळे आव्हानांना सामोरे जात आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, भारतीय बँकिंग व्यवस्थेसमोर असे कोणतेही महत्त्वाचे आव्हान निर्माण झाले नाही. तर एंजल वन लिमिटेड फर्मचे तज्ञ म्हणतात की, या तिमाहीत SBI बँकेच्या शेअरमध्ये मजबूत सुधारणा झाली आहे. आर्थिक मंदीचे संकेत आणि जागतिक बँकिंग प्रणालीशी संबंधित वाढत्या भीतीमुळे, आणि सर्व नकारात्मक बातम्यांमुळे बँकिंग क्षेत्र कमालीचा दबावाखाली आला आहे.
आणखी घसरण होणार? :
अनेक ब्रोकरेज फर्म तज्ञांनी आपल्या गुंतवणूकदारांना सावध गुंतवणूक सल्ला दिला आहे. कारण तांत्रिकदृष्ट्या जर SBI स्टॉक 500 रुपयेच्या खाली गेला, तर स्टॉकमध्ये आणखी पडझड पाहायला मिळू शकते. घसरणीनंतर त्याची अंदाजित सपोर्ट लेव्हल 460-470 रुपये असू शकते. आणि वरच्या दिशेने SBI स्टॉक 560 रुपये पर्यंत वाढू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		