
SBI Life Certificate | पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 80 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या अत्यंत ज्येष्ठ पेन्शनधारकांसाठी दरवर्षी 1 ऑक्टोबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सुरुवात होते. तर, इतर व्यक्तींसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होते. पेन्शन नियामक पीएफआरडीएने बँकांना अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन जीवन प्रमाणपत्र अपलोड किंवा जमा करण्यासाठी घरपोच मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन प्रमाणपत्र मिळविण्याच्या सुलभतेबाबत जनजागृती करण्यासाठी सर्व बँकांनी विविध प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असा सल्ला पेन्शन विमा नियामकाने दिला आहे. बँकांनी घरपोच बँकिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करून अंथरुणाला खिळलेल्या, रुग्णालयात दाखल पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा बँकेच्या शाखेद्वारे घरबसल्या आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे काय?
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या म्हणण्यानुसार, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाण) ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक-सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र किंवा राज्य सरकार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक ज्यांची पेन्शन वितरण एजन्सी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) साठी लाईव्ह आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?
सरकारने आता आधार डेटाबेसवर आधारित फेस-रिकग्निशन तंत्रज्ञान प्रणाली तयार केली आहे, ज्यामुळे अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोन असलेल्या कोणालाही त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) सादर करण्याची परवानगी मिळते. पेन्शनधारक जीवन प्रमाण पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे जीवन प्रमाणपत्र देखील सादर करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.