SBI Share Price | तुम्ही SBI बँकेत FD करता? पण SBI शेअर देईल तब्बल 25 टक्के परतावा, टॉप ब्रोकरेजचा सल्ला

SBI Share Price | एसबीआय बँकेच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या शेअरधारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा ताळेबंद मजबूत असून बँकेची भांडवली स्थिती देखील चांगली आहे. एसबीआय बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता दृष्टीकोन सुधारल्यामुळे भारतातील अनेक ब्रोकरेज हाऊसेसने एसबीआय बँकेच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

मागील एका महिन्यात एसबीआय स्टॉकने लोकांना 14 टक्के नफा कमावून दिला आहे. आज 1 जानेवारी 2024 रोजी एसबीआय बँक स्टॉक 0.46 टक्के वाढीसह 645 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारतातील अनेक ब्रोकरेज हाऊसनी एसबीआय बँक स्टॉकवर 800 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. अॅक्सिस सिक्युरिटी, एसएमसी ग्लोबल आणि मोतीलाल ओसवाल सिक्युरिटी एसबीआय बँक स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत होणाऱ्या सुधारणांचा सर्वाधिक फायदा स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळण्याची शक्यता आहे.

कारण एसबीआय बँक भारतातील सर्वाधिक ग्राहकांना सेवा प्रदान करते. 2024 या नवीन वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉक 800 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत एसबीआय स्टॉक 25 टक्के अधिक वाढू शकतो.

ब्रोकरेज हाऊसच्या मते, स्टेट बँक ऑफ इंडियाची कामगिरी किंचित सुधारली आहे. बँकेने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सोबत बँकेने आपल्या मालमत्तेच्या गुणवत्तेमध्ये देखील सुधारणा केली आहे. त्यामुळे एसबीआय स्टॉक पुढील काळात चांगली कमाई करून देऊ शकतो. मागील सहा महिन्यात एसबीआय स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या बँकेचे शेअर्स 5.36 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 1 वर्षात त्यांनी एसबीआय स्टॉकने लोकांना 5.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price NSE 01 January 2024.