 
						SBI Share Price | भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’ च्या गुंतवणूकदारांसाठी एक चिंताजनक बातमी आली आहे. परकीय ब्रोकरेज हाऊस UBS ने स्टेट बैंक ऑफ इंडियाचे शेअर्स विकण्याची शिफारस केली आहे. परकीय ब्रोकरेज हाऊसने एसबीआयच्या शेअर्सची लक्ष किंमत 740 रुपयेवरून कमी करून 530 रुपये केली आहे.
तज्ञांनी स्टॉक रेटिंग डाउनग्रेड केल्यानंतर, एसबीआय बँक स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 575 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी एसबीआय बँक स्टॉक 1.68 टक्के घसरणीसह 576.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज हाऊस यूबीएसने अॅक्सिस बँकेच्या स्टॉकचे रेटिंगही कमी केले आहे. ब्रोकरेज हाऊस यूबीएसने आपल्या अहवालात स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या भविष्यातील कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या ब्रोकरेज हाऊस फर्मने एसबीआय बँक स्टॉकची रेटिंग कमी करण्याचे विविध कारण आपल्या अहवालात नमूद केले आहे.
UBS ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बँकेच्या परताव्याचे प्रमाण आर्थिक वर्ष 2024 मध्ये सर्वोच्च आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये कमी होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊसने एसबीआय बँकेच्या असुरक्षित कर्ज वाढीबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. बँकेच्या एकूण कर्जामध्ये असुरक्षित कर्जाचा वाटा 10.8 टक्केवर पोहचला आहे.
परकीय ब्रोकरेज हाऊस यूबीएसने Axis Bank बँकेच्या स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. ब्रोकरेज हाऊसने अक्सिस बँकेच्या शेअरवर सध्या न्यूट्रल रेटिंग दिली आहे. आणि अक्सिस बँकेच्या शेअर्सची लक्ष किंमत 1150 रुपयेवरून कमी करून 1100 रुपये केली आहे.
मागील 6 महिन्यांत SBI बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 एप्रिल 2023 रोजी एसबीआय बँक स्टॉक 533.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 13 ऑक्टोबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 575 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत फक्त 10 टक्के वाढली आहे. एसबीआय बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 629.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 499.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		