 
						Multibaggerer Stock | ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ या टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून जबरदस्त वाढत आहेत. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 157.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. भारत सरकारच्या अंदाजानुसार भारतीय वस्त्रोद्योग पुढील आठ वर्षांत तीन पट अधिक वाढू शकतो. भारतीय वस्त्रोद्योग सध्याच्या 100 अब्ज डॉलरवरून वाढून 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर पर्यंत जाऊ शकतो. मागील एक वर्षभरात ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’कंपनीचे शेअर्स 91 टक्के कमजोर झाले होते.
‘SEL मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 91 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स 1881 रुपयेवरून घसरुन 154 रुपयांवर आले आहेत. म्हणजेच मागील एका वर्षभरात ज्या लोकांनी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन आठ हजार रुपयांवर आले आहेत. या शेअरवर पैसे लावणाऱ्या लोकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ‘SEL मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 149.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,237.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 510.27 कोटी रुपये आहे. ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनी कर्जबाजारी झाली आहे. कंपनी कर्जत बुडाली असून मागील वर्षी तिचा व्यापारही अनेक दिवस बंद करण्यात आला होता.
कंपनीचे तिमाही निकाल :
‘SEL मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीला 45.20 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला 28.30 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा सेल्स 21.55 टक्के वाढीसह 142.57 कोटी रुपयेवर पोहचला होता. एका वर्षापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा सेल्स 117.29 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 10.49 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 6.04 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		